शरद पवार अ‌ॅक्शन मोडमध्ये ; मोदी सरकार निर्णय घेण्याआधीच समिती केली स्थापन!

Sharad Pawar-PM MODI

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या बँकिंग कायद्यामधील) सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एका समितीच्या स्थापनेचे निर्देश दिले होते. हे पाहता पुन्हा अ‌ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते.

पवारांच्या निर्देशानुसार उपसमिती स्थापन केली असून भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्याची तयारी केली आहे. सहकारी बँका (Cooperative Bank) जगवण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) उपसमितीचे अध्यक्ष असणार आहे.

या समितीमध्ये महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही नेते असणार आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम हे देखील असणार आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे असतील. शिवसेनेकडून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपसमितीत असणार आहेत. या उपसमितीची पहिली बैठक उद्या होणार आहे.

दरम्यान मोदी सरकार (Modi Govt) सहकारी बँकांच्या संदर्भात नवीन नियमावली आणत सहकारी बँकांवर निर्बंध आणणार आहे. विशेष म्हणजे, सहकारी बँकांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांचे प्रामुख्याने प्रभुत्व आहे. संबंधित कायदा आल्याने सहकारी बँकांवरील वर्चस्वावर गदा येत असल्याने सहकार क्षेत्रातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात कायदेशीर भूमिका घेत संघर्ष करण्याची तयारी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button