शरद पवार भूल देतायत की दिशाभूल करतायत? केंद्रीय कृषी मंत्र्यांचा सवाल

Narendra Singh Tomar - Sharad Pawar

मुंबई :- केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात सध्या ट्विटरवरून वाद पेटला आहे. हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या याबाबत दोघांमध्ये मतभेद असल्याचं दिसत आहे. पवार म्हणतायत की नव्या कायद्यांनी हमीभाव आणि बाजार समित्यांची व्यवस्था खिळखिळी होईल तर तोमर म्हणतायत की पवारांसमोर चुकीची माहिती ठेवली जाते. यासंदर्भात दोघांनी ट्विट केले आहे .

महाराष्ट्रासह देशभरात बजेटवर चर्चा असतानाच शरद पवारांनी एका पाठोपाठ 9 ट्विट केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना उद्देशून केली आहेत. त्यांच्या ट्विटमध्येही दोन गोष्टीवर भर आहे. पहिली, मंडी व्यवस्थेचं (महाराष्ट्रात बाजार समित्या, आडती) काय होणार आणि दुसरं शेती मालाला हमीभाव. पवार ट्विटमध्ये म्हणतात, मूळ स्वरूपाच्या कायद्यांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य हमीभाव देण्याचे कोणतेही अभिवचन दिले गेले नव्हते. केवळ शेतकरी आंदोलनानंतर त्यात एमएसपीचा संदर्भ आणला गेला. दुसरी, नवी कायद्यानुसार शेतकरी आपला माल बाजार समितीच्या बाहेर विकू शकतात, परंतु त्यात खासगी खरेदीदारांकडून खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांना हमीभावाचे संरक्षण दिलेले नाही. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे हे सुरुवातीपासूनच म्हणणं होते.

ही बातमी पण वाचा : शेतकऱ्यांना खरे ते सांगा; शरद पवारांनी कृषीमंत्री तोमर यांना सुनावले

पवारांनी एका पाठोपाठ 9 ट्विट केल्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री तोमर उत्तर देणार नाहीत असं कसं होईल. तेही ट्विटमध्ये म्हणाले, शरद पवार हे एक वरिष्ठ नेते आहेत. केंद्रीय कृषी मंत्री असताना, त्यांनीच शेती कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. आणखी एका ट्विटमध्ये तोमर म्हणतात, मंडी व्यवस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही, उलट त्या आणखी फायदेशीर आणि स्पर्धात्मक बनतील, असे तोमर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER