शरद पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले – बाळासाहेब थोरात

Rahul Gandhi -Sharad Pawar-Balasaheb Thorat

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राहुल गांधींमध्ये (Rahul Gandhi) सातत्याचा अभाव असून पक्षात त्यांची स्वीकारार्हता आहे का हे पहावे लागेल, असे वक्तव्य एका मुलाखतीत केले होते .

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. द पवार हे राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, असे थोरात म्हणाले आहेत .

राहुल गांधींना पक्षात स्वीकारार्हता आहे, आमचे ते नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधींनी जीवनात जे दुख पाहिले, त्यांच्यावर जे आघात झाले त्यातूनही उभे राहून ते नेतृत्व करतायत. पुढील काळातही ते समर्थपणे नेतृत्व करणार आहेत.’

राहुल गांधी करत असलेल्या कामाच्या विरोधात भाजपच्या प्रचार यंत्रणा काम करतात. राहुल गांधी पुढची वाटचाल यशस्वी करणार आहेत. त्यावर आमचा विश्वास आहे. शरद पवारांचे ज्येष्ठत्व आम्ही मान्य करतो. मात्र ते राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले असं वाटतं. असं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

ही बातमी पण वाचा : काँग्रेसही उतरणार शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’मध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER