चौकशीची गरज पडणार नाही ; ईडीचा शरद पवारांना मेल

sharad pawar-ncp-ed

मुंबई :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (एमएससी बँक) कर्जांचे वितरण करताना २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या आरोपप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांवर मनी लॉंड्रीगचा गुन्हा दाखल केला आहे. आज दुपारी दोन वाजता बॅलार्ड पियर येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात स्वतःहून जाणार आहेत. त्यापूर्वी मुंबई पोलिसांनी कलम १४४ लागू करत मुंबईत जमावबंदी लावली आहे.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीचे बडे नेते पोहचले शरद पवारांच्या निवासस्थानी

आता इडीने आता मोठा यु टर्न घेतला आहे. तूर्तास चौकशीची गरज नाही, आणि भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही असा ई-मेल ईडीने शरद पवारांना केला आहे. त्यानंतर देखील शरद पवार यांनी इडी कार्यालयात जाणार असल्याची भूमिका घेतली आहे.

दरम्यान शरद पवार ईडीच्या कार्यालयात जाण्याआधीच ईडीने कठोर भूमिका घेतली आहे. शरद पवार आरोपी आहेत, ईडीमध्ये येण्याबाबत पवार ठरवू शकत नाहीत. चौकशीला बोलावल्यानंतरच पवारांना यावं लागेल, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.