शरद पवार कोणतीच गोष्ट सहज घेत नाहीत, माझंही पुस्तक चाळतील : प्रवीण दरेकर

Sharad Pawar - Pravin Darekar

मुंबई :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केलेल्या कार्याचा “वर्षभराचा लेखाजोखा” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. त्याच पुस्तकाच्या मुद्द्यावरून प्रवीण दरेकरांना शरद पवारांनी (Sharad Pawar) खडेबोल सुनावले होते . शरद पवार कोणतीच गोष्ट सहज घेत नाही, माझंही पुस्तक चाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार साहेब अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या काळातले अनेक किस्से त्यांनी सांगितलेत. सरकार बरखास्तीचा किस्सा सांगितला आणि माझ्या ज्ञानात भर पडली. त्यांच्या राजकीय जीवनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. आमच्यासारख्या नवोदित कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. कार्यक्रम संपल्यानंतर मी विचारलं की माझं पुस्तक मिळाले का?, पण त्यांना ते पुस्तक मिळालं नाही, असे त्यांनी सांगितले . माझं पुस्तक मिळण्याची ते वाट बघतायत, असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी लगेच माझं पुस्तक त्यांना सुपूर्द केले.

शरद पवार माझे पुस्तक नक्कीच चाळतील. त्यांना कामाच्या व्यापामुळे पूर्ण पुस्तक वाचता येईल की नाही हे माहीत नाही. पण ते पुस्तक नक्कीच चाळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ही बातमी पण वाचा : अखेर प्रवीण दरेकर आणि शरद पवारांची झाली भेट 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER