सखोल चौकशी होईल, विषय गंभीर आहे : नवाब मलिक

Sharad Pawar-Nawab Malik

मुंबई :  ‘सामना’ वर्तमानपत्राला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. सामना हा सेनेशी संलग्न असलेले वर्तमानपत्र आहे. त्यामुळे हा वाद निर्माण करणे योग्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी चर्चा करून सर्वांना जबाबदारी दिली आहे, असे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले, असा गौप्यस्फोट रोखठोकमधून करण्यात आला.

एकत्र लढायचे की वेगवेगळे, ते ठरेल

“लोकशाहीत एखाद्या वर्तमानपत्राला विश्लेषण करणे, मत मांडणे हे त्यांचे अधिकार आहे. सामना हे शिवसेनेशी संलग्न आहे. त्यामुळे जे वर्तमानपत्र अधिकार आहे. याबद्दल किती सत्यता आहे हे मला माहिती नाही. पण पवारांनी चर्चा करून ही जबाबदारी वाटून दिली आहे. राजकीय परिस्थिती पाहून पुढे निवडणुका होणार आहे. एकत्र लढायचे की वेगवेगळे, ते ठरेल. काही ठिकाणी भाजप गिणतीत नाही. त्यांना रान मोकळं कशाला करून द्यायचं.” असेही नवाब मलिक म्हणाले.

विषय गंभीर, सखोल चौकशी होईल

“रश्मी शुक्ला प्रकरणी संभ्रम निर्माण होताना फडणवीस यांच्या मनात भीती निर्माण झाली की नाही हे मला माहिती नाही. हा अहवाल निराधार होता. त्यामुळे खुलासा करणं आमची जबाबदारी होती. तपासातून सगळं बाहेर येईल, गुन्हा दाखल झाला आहे. ऑफिसर सिक्रेट अ‍ॅक्टचा प्रश्न आहे. सखोल चौकशी होईल. विषय गंभीर आहे.” असेही नवाब मलिक म्हणाले.

अनिल देशमुखांकडे अपघाताने गृहमंत्रिपद

अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद अपघाताने मिळाले. जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद शरद पवार यांनी देशमुखांकडे दिले. अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्याने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’ असे वर्तन गृहमंत्र्यांचे असायला हवे. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते, ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो, हे विसरून कसे चालेल? असा सवालही सामनातून करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button