शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज, ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पवार आता काही दिवस घरीच आराम करणार आहेत. पवारांवर १५ दिवसात दोनदा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ही माहिती दिली.

शरद पवार यांना ११ एप्रिल रोजी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. १२ एप्रिल रोजी त्यांच्या पित्ताशयावर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन दिवस हॉस्पिटलमध्ये विश्रांती घेतल्यानंतर आज शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची तब्येत बरी आहे. देशभरातील जनतेने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय दिलेल्या पाठिंब्याबद्दल नवाब मलिक यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button