शरद पवारांना डिस्चार्ज; डॉक्टरांनी दिला ‘हा’ सल्ला

Sharad Pawar Maharashtra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर त्यांना 30 मार्च रोजी ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार यांना अखेर चार दिवसानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पवार हे थोड्याच वेळात सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जावई सदानंद सुळे उपस्थित होते.

डॉक्टरांनी पवारांना सात दिवस सक्तीने आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे या सात दिवसात पवारांच्या निवासस्थानी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी बंगल्याभोवतीच्या सुरक्षेत वाढही करण्यात आली आहे. सात दिवस पवार घरीच आराम करणार असल्याचं सूत्रांनी सांगितले .

15 दिवसानंतर पवारांची पुन्हा एकदा तपासणी केली जाईल. त्यांची प्रकृती उत्तम असेल तर त्यांच्या गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात येणार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी सांगितले. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button