…म्हणून शरद पवारांनी हात जोडले

Sharad Pawar - Corona Virus

मुंबई : कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही या विषाणुचा शिरकाव झाला असल्याचे वृत्त येत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय यंत्रणाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेत आहे आणि इतरांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगत आहेत.

कोरोना विषाणुने जगभरात दहशत निर्माण केली आहे. कोरोना पासून बचावासाठी भारतीय संस्कृतीला सर्वोच्चस्थानी ठेवण्यात आले आहे. भारतीय परंपरेनुसार जेव्हा दोन व्यक्ती भेटतात तेव्हा हात जोडून नमस्कार करण्याची पद्धत आहे. नमस्कार करण्याची हीच पद्धत योग्य आणि सुरक्षीत असल्याचे मत इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. तसेच इस्राइलच्या जनतेला भारतीय संस्कृतीतला होत जोडून नमस्कार करण्याचे आवाहन केले आहे. तर महाराष्ट्रातही कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासनाकडून जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे.

प्राथमिक शिक्षा, कौशल्य विकास, बाल संरक्षण या क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रथम संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वाय बी चव्हाण प्रतिष्ठान येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रथम संस्थेला अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था आणि मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात शरद पवारांकडून पुरस्कार घेतल्यानंतर हात मिळविण्यासाठी आलेल्या पुरस्कारकर्त्याला, हात न मिळविता दोन वेळा हात जोडून नमस्कार केला. शरद पवारांच्या या कृतीने सभागृहात हशा पिकला, तर पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य दिसलं. मात्र, पवारांनी त्यांच्या या कृतीतून कोरोना सुरक्षिततेबाबत अप्रत्यक्ष संदेश दिला.