शरद पवारांनी हेलिकॅप्टरमुळे कापले माझे खासदारकीचे तिकीट – सुजय विखे

Sujay Vikhe & Sharad Pawar

अहमदनगर : तू आत्ताच हेलिकॅप्टरमधून फिरतोस, निवडून कसा येणार? असा प्रश्न करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माझे खासदारकीचे तिकीट कापले, असा गौप्यस्फोट भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केला.

जिल्हा बॅकेच्यावतीने शेतकऱ्यांसाठी खेळते भाडंवल म्हणून वाळकी, वडगाव तांदळी येथे सुमारे ११ कोटी रुपयांचा धनादेश खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी हे सांगितले. आमदार बबनराव पाचपुते, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, सुरेश सुंबे, सरपंच स्वाती बोठे, दिलीप भालसिंग, भाऊसाहेब बोठे, शरद बोठे, संतोष भापकर आदी उपस्थित होते. खासदार विखे यांनी जिल्ह्यातील विकासावरून विरोधी पक्षांच्या आमदारांचा समाचार घेताना सुजय विखे म्हणालेत, जिल्ह्यात सध्या टक्केवारीचा खेळ सुरू आहे. भाजपाच्या सत्ता काळात टक्केवारी घेतली गेली नाही.टक्केवारी आमच्या रक्तात नाही.

भाजपाचे आमदार असताना मंजूर केलेल्या विकास कामांचे उद्घाटने हे लोक करीत आहेत. नगर जिल्ह्याध्ये कोरोनाची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने ६० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला होता. या सरकारने काय दिले हे आधी सांगावे. हे सरकार फक्त केंद्राकडून जीएसटीचे पैसे मागत आहेत. आम्ही जीएसटीचे पैसे आणून देण्यासाठी मदत करतो. ते पैसे शेतकऱ्यांना देणार का, असा प्रश्न त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER