शरद पवारांना आरक्षण देता आले असते, त्यांनी दुर्लक्ष केले; मराठा महासंघाचा आरोप

Shashikant Pawar - Sharad Pawar - Udayanraje Bhosale

सातारा : मुख्यमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण देऊ शकले असते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार (Shashikant Pawar) यांनी केला. ते मराठा आरक्षणाबाबतच्या (Maratha Reservation) पत्रपरिषदेत बोलत होते.

शशिकांत पवार आणि भाजपाचे (BJP) खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी जलमंदिर पॅलेस येथे ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन घेतली. पवार म्हणालेत, शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्यावेळी, त्यांच्या शिफारशीनुसार मराठा समाजाला आरक्षण देता आले असते. पण पवारांनी तेव्हा दुर्लक्ष केले; त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकले नाही.

पवार मुख्यमंत्री असताना त्यांना मी भेटलो होतो. मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली होती. पण, त्यांनी काही अडचणी आहेत असे सांगून ते टाळले. तेव्हापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिला. पवारांनी मनावर घेतले असते तर तेव्हाच हा प्रश्न सुटला असता, असे शशिकांत पवार म्हणाले.

जमत नसेल तर बाजूला व्हा – उदयनराजे

खासदार उदयनराजे भोसले यांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे. तो राज्यानेच सोडवला पाहिजे. सारखे केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याची गरज नाही. जमत नसेल तर बाजूला व्हा आणि ज्यांना जमते त्यांना करू द्या. स्वत:ही काही करायचे नाही आणि दुसऱ्यावर खापर फोडायचे, हे आता सोडून द्या, असा टोमणा उदयनराजे यांनी शिंदेना मारला.

मराठा आरक्षणाबाबतची नैतिक जबाबदारी मराठा समाजाचे आमदार आणि खासदारांची आहे, ती त्यांनी पार पाडली पाहिजे. सर्व जातीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. सर्वाना जसा न्याय मिळाला तसा मराठ्यांनाही मिळाला पाहिजे. मराठा आरक्षणात राजकारण नको. स्वार्थासाठी एकत्र येणाऱ्या लोकांना समाजाने बाजूला केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER