शरद पवार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जयंत पाटलांकडून मंत्री मुश्रीफ यांच्या तब्येतीची विचारपूस

Sharad Pawar - Uddhav Thackeray - Ajit Pawar - Jayant Patil - Hasan Mushrif

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार (Sharad Pawar), मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या तब्येतीची विचारपूस केली. श्री. पवार व श्री. ठाकरे यांनी दूरध्वनीवरून दोन वेळा मंत्री मुश्रीफ यांच्याशी संवाद साधून प्रकृतीची चौकशी केली.

कोरोनाचा (Corona) अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून ती सुधारत असल्याचे माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना आरोग्यबद्दल योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. तसेच वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत तुमची राज्यातील जनतेला फारच गरज आहे. त्यामुळे लवकर बरे व्हा आणि लवकर बाहेर पडा, अशा सदिच्छा व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER