
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज वाढदिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीच्या वतीने दुपारी वाय.बी. चव्हाण सभागृहात ८ दशकं कृतज्ञतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर सायंकाळी शरद पवार यांनी कुटुंबीयांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ खासदार सु्प्रिया सुळे यांनी सोशल केला आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवारदेखील उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली व वाढदिवसाचे फोटो शेअर केलेत.
आदरणीय @PawarSpeaks साहेबांचा वाढदिवस मुंबई येथे साजरा करण्यात आला.कुटुंबातील सदस्यांनी त्यांचे औक्षण करुन त्यांच्या दिर्घायुष्याची प्रार्थना केली.यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबीय उपस्थित होते. @AjitPawarSpeaks @RRPSpeaks pic.twitter.com/rLQJHgrX7R
— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2020
खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे फोटोदेखील ट्वीटरवर शेअर केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांचा आज ८० वा वाढदिवस. या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित डिजिटल रॅलीच्या विशेष कार्यक्रमाचे राज्यभरातील सात विविध केंद्रावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.
(Cntd) pic.twitter.com/WngV8SyN25— Supriya Sule (@supriya_sule) December 12, 2020
सुप्रिया सुळे यांनी सकाळी पोस्ट करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सुळे यांनी वडिलांसोबत एक फोटो पोस्ट करुन, अभिष्टचिंतन केलं होतं. “वयाची आठ दशकं पार करत असताना आदरणीय शरद पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात राष्ट्रवादीच्यावतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमही राबवण्यात आले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला