शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये ; दिल्लीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक, गृहमंत्री बदलणार?

Maharashtra Today

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बची दखल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे . याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे . पवार हे राष्ट्रवादीच्या मोजक्याच नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख जाणार की नाही? याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लेटर बॉम्बनंतर पवारांनी देशमुखांशी फोनवरून चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटलांशीही पवारांनी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्लीत पाचारण केल्याचेही माहिती आहे .

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल , अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे . परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली असून परमबीर सिंग हे मात्र मुंबईतल्या मलबार हिल परिसरातील त्यांच्या घरीच असल्याची माहिती मिळते.

शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज संध्याकाळी 5 वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी गृहमंत्री बदलण्याविषयी चर्चा होणार आहे. तसेच परमबीर सिंग यांच्या आरोपातील सत्यतेबाबतही चर्चा करण्यात येणार आहे. या पत्रात सिंग यांनी शरद पवारांनीही गृहमंत्र्यांविरोधात तक्रार केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER