लालकिल्ल्यावर गडबड करणारे सत्ताधारी गटाचे काही लोक होते, पवारांचा आरोप

Red Fort Violence - Sharad Pawar

सोलापूर : केंद्र सरकारच्या नव्या कृषीकायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरु आहे. या कायद्यांना रद्द करावे यामागीसाठी प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या ट्रॅक्टर रॅलीने (Tractor Rally) हिंसक वळण घेत लाल किल्ल्यावर कूच केली होती. त्यानंतर लाल धर्मधव्ज फडकावला होता. यावेळी आंदोलकांनी धुडघूस घालून तोडफोडही केली होती. आत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सत्ताधारी भाजपवरच (BJP) आरोप केले आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर धुडगूस घालणारे सत्ताधाऱ्यांपैकीच होते, असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. शरद पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला.

प्रजासत्ताक दिनी (Republic Day) लाल किल्ल्यावर (Red Fort) जो धुडघूस घातला गेला याबद्दल आम्ही जरा खोलात जाऊन माहिती जाणून घेतली. त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की लाल किल्ल्यावर गोंधळ घालणारी लोकं शेतकरी नव्हते तर त्यात सत्ताधारी गटाचे काही लोक होते, असं मोठं आणि तितकंच गंभीर वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

यावेळी पवार म्हणाले की, पंजाब, युपी, बिहार आदी राज्यातील शेतकरी टप्प्याटप्प्याने राजधानी नवी दिल्लीच्या सीमेवर उपोषणाला बसले आहेत. खरेदीची आणि मालाची योग्य किंमत द्यावी एवढीच त्यांची मागणी आहे. केंद्र सरकार केवळ आश्वासन देतेय मात्र प्रत्यक्ष काहीच करत नाही, असा आरोप पवार यांनी केला.

नानासाहेब काळे यांच्यामुळे नान्नज हा देशात ओळखला गेला. आधी नान्नज मध्ये पानमळे झाले त्यानंतर कांदा उत्पादन जास्त झाले. आता नान्नज द्राक्ष उत्पादनात पुढे आहे. मी कृषी मंत्री असताना देशातील डाळिंब संशोधन केंद्र सोलापुर जिल्ह्यात स्थापन केले, असंही पवार यांनी सांगितलं. शेतीच्या क्षेत्रात विज्ञान आणणे आवश्यक असल्याचं मतंही त्यांनी व्यक्त केलं. तसंच शेतीचं चित्र बदलण्यासाठी विज्ञान आणावंच लागेल, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER