बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे नेते होते, हे शरद पवारही मानायचे – नितेश राणे

Sharad Pawar & Nitesh Rane

मुंबई :- ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रकाशित करण्यात आला. आणि यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली.

नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “लहानपणापासून सामनात केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या मॅरेथॉन मुलाखती घेतल्याच्या आपल्याला माहिती आहेत. ही त्यांच्या समर्थकांसाठी आणि त्यांच्या विरोधक अशा दोघांसाठीही मेजवानी असायची. बाळासाहेब ठाकरे गर्दी खेचणारे नेते होते. अगदी शरद पवारही हे मानायचे; मात्र हीच ओळख (ब्रँड ठाकरे) सध्याच्या सामनाच्या संपादकांनी संपवली आहे.”

दरम्यान, संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बाळासाहेबांची आठवण येते का? या राऊतांनी विचारलेल्या प्रश्नाचं पवारांनी ‘होय’ असं उत्तर दिलं. “आपण सर्व पहिले दोन महिने अस्वस्थ घरात बसून होतो. माझ्यापेक्षा बाळासाहेबांच्या कामाची पद्धत तुम्हाला जास्त माहिती आहे. ते काही दिवस घराबाहेर पडायचे आणि व्यस्त असायचे असं नाही. दिवस दिवस त्यांनी घरात घालवले आहेत. पण ते दिवस घालवताना त्या परिस्थितीला सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहित करून संकटाला कसं तोंड द्यायचं हे बाळासाहेबांनी नक्कीच शिकवलं होतं. म्हणून या दोन महिन्यांमध्ये बाळासाहेबांची आठवण येते. ” असं पवारांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER