शरद पवार ठरले कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले नेते

मुंबई : आजपासून देशभरात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरणाच्या (corona vaccine) दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी दिल्लीतील एम्समध्ये जाऊन भारत बायोटेकच्या (India Biotech) को-व्हॅक्सिनचा पहिला डोज घेतला. कोरोना लसीकरणाच्या या टप्प्यात 60 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. तसंच गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या 45 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना करोना लस देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरोना लसीचा पहिला डोज घेतला.

आज दुपारी शरद पवार कारोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित होत्या. सध्या देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात आहे. त्यामुळे शरद पवार हे सुद्धा लस घेण्यासाठी पोहचले. पवार यांची सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात आली. शरद पवार हे कोरोना प्रतिबंधक लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.भारतात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड या लसी देण्यात येत आहेत. मात्र कोणती लस कोणाला द्यायची याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची नियमावली ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER