भावुक होत शरद पवार म्हणाले… ‘यासाठी मी लोकांना माझा देव मानतो’

Sharad Pawar

मुंबई : एकेकाळी ५४ आमदारांपैकी ४८ आमदारांनी माझी साथ सोडली होती. केवळ सहा आमदारांच्या भरवश्यावर राष्ट्रवादीच्या वाटचालीला सुरुवात केली. अश्या संकटसमयी मला महाराष्ट्रातील तमाम जनतेने साथ दिली. जनतेने दिलेल्या विश्वासामुळे आणि सहकार्यामुळे आज राष्ट्रवादीचे अस्तित्व कायम आहे. यासाठीच मी लोकांनाच देव मानतो, अशी भावुक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. लोकमत वृत्तपत्राचे समूह संपादक विजय दर्डा यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, काही गोष्टींचे मला खरंच समाधान वाटते. कृषिमंत्री म्हणून देशात काम करण्याची संधी मिळाली. माझ्याकडे कृषी आणि अन्न नागरी पुरवठ्याची जबाबदारी होती. ज्या दिवशी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली त्याच दिवशी माझ्याकडे एक फाईल आली. देशातील गव्हाचा साठा कमी झाल्याने परदेशातून गहू आयात करण्याच्या परवानगीसाठी ती फाईल माझ्याकडे आली होती. मात्र कृषिप्रधान देशाचा कृषिमंत्री म्हणून पहिल्याच दिवशी परदेशातून गहू आयात करण्याला परवानगी देणे मला पटले नाही. मी त्या फाईलवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतः फोन करत सही करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नाईलाजाने मला सही करावी लागली. त्यादिवशी ठरवलं की शेतीप्रधान आपल्या देशाचं चित्र बदलवायचं. आणि दहा वर्षानंतर कृषिमंत्रिपद सोडलं तेव्हा मला एका गोष्टीच समाधान वाटलं ते म्हणजे भारत हा जगातील दुसऱ्या नंबरचा गहू उत्पादक आणि निर्यात करणारा देश म्हणून पुढे आला. जगातील १ नंबरचा तांदूळ निर्यात करणारा आणि साखर निर्माण करणारा दुसऱ्या नंबरवर होता.

ही बातमी पण वाचा : ‘शरद पवारांचे विधान वडिलांचा सल्ला म्हणून स्वीकारावे’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER