शरद पवार शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात ; आता कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढणार

Sharad Pawar - Onion Issue

मुंबई : केंद्र सरकारने कांदा (Onion) प्रश्नांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गात मोठी नाराजी आहे. काही दिवसांपासून कांद्याचे लिलाव देखील बंद आहेत याचा थेट परिणाम हा कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर होत असतो. कांद्याच्या प्रश्नांबाबत भारत सरकारच्या वतीने जे निर्णय घेण्यात येत आहेत ते महाराष्ट्र व इतर राज्यातील शेतकऱ्यांना अडचणीचं ठरत आहेत, यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा मैदानात उतरणार आहेत .

शरद पवार यांनी ऊसतोडणीच्या दरावर तोडगा काढल्यानंतर आता नाशिककडे आपला मोर्चा वळवला आहे . आज पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केलीय. गेल्या दोन दिवसांपासून हा तिढा सुरू आहे. यावर आता पवार उद्या तोडगा काढतात का याबाबत उत्सुकता लागली.

यासंदर्भात माहिती देताना पवार म्हणाले की , मी नाशिकला जाणार आणि कांदा उत्पादकांना भेटून त्यांची भूमिका जाणून घेणार आहे. केंद्र सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांच्या हिताची आहे, असं वाटत नाही. आयातीला पाठिंबा आणि साठा करण्यासाठी मर्यादा हे धोरण आहे. तसेच यावेळी शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर बोलण्यास टाळले .

दरम्यान शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कांद्याला चांगले भाव मिळायला सुरवात झाली, तर नियम आणि अटी टाकून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचा आरोप शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER