डॅमेज कंट्रोलसाठी शरद पवार साताऱ्यात दाखल, निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष

NCP - Sharad Pawar

सातारा : आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानंतर राजकीयसह शैक्षणिक क्षेत्रात मोठी उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट आज साताऱ्यात दाखल झाले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) साताऱ्यात डॅमेज कंट्रोलसाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्वपूर्ण बैठक संपन्न होणार आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत तीन वर्षे कार्यरत असलेले माजी सचिव कऱ्हाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शरद पवार आणि रयतचे पदाधिकारी यांच्यात काय चर्चा होणार, त्याचबरोबर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER