पीएमओमधील हिंदुत्वविरोधी अधिकारी शरद पवार, सुप्रिया सुळेंच्या संपर्कात

Sharad Pawar - Supriya Sule - Subramanian Swamy

नवी दिल्ली : पंतप्रधान कार्यालयात काम करणाऱ्या हिंदूविरोधी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा ताबा घेतला असून त्यांतील काही अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

ट्रक उलटून झालेल्या अपघातात ५ ठार

हिंदुत्वविरोधी असलेले हे अधिकारी शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याही संपर्कात आहेत, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमधून हा खळबळजनक दावा केला आहे. हे हिंदुत्वविरोधी अधिकारी राष्ट्रभक्त अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहेत. राष्ट्रभक्त अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करू पाहात आहेत, त्यामुळे हे अधिकारी राष्ट्रभक्त अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहेत, असा अंगुलिनिर्देश स्वामी यांनी केला आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनापासून आपण काही तरी धडा शिकलाच पाहिजे, असेही स्वामी ट्विटमध्ये म्हणाले.