पंढरपुरात व कोणत्याही धार्मिकस्थळी जाण्यासाठी मला कोणाच्याही परवानगीची गरज नाही – शरद पवार

Sharad Pawar-National Warkari Council

पुणे :- विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असतं. माऊलींच्या दर्शनाला आळंदीला जायचं असतं. तुकोबांच्या दर्शनाला देहूला जायचं असतं, पण यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेचा खरपूस समाचार घेतला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आळंदी येथे बोलताना राष्ट्रीय वारकरी परिषदेने त्यांच्यावर केलेल्या आरोपाला त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही. पंढरपूरला मी नेहमी जात असतो, प्रसिद्धी करत नाही. पहाटे लवकर जाऊन विठ्ठलदर्शन घेत असतो, असं पवार यांनी सांगितले.

कोण आस्तीक कोण नास्तिक हे ठरवणारे कोण असतात. मला धार्मिकस्थळी परवानगी नाकारणा-यांनाच वारकरी संप्रदायाचे विचारच समजले नसल्याचेही पवार म्हणाले. तसेच, विठ्ठलाचा खरा भक्त आणि सच्चा वारकरी अशी भूमिका खधीच घेणार नाही. म्हणून त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. लहान सहान गोष्टी होत असतात. त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. आपला मार्ग सोडायचा नसतो. बांधिलकी ठेवायची असते, तिथे तडजोड करायची नसते. त्याच भावनेने इथे आलो, असं शरद पवार म्हणाले.

त्याचप्रमाणे, मनात कोणताही हेतू ठेवून मी इथे आलेलो नाही. पंढरपूर, देहू, आळंदी, तुळजापूर अशा ठिकाणी मी नेहमी जातो. पण कोणतंही प्रदर्शन, प्रसिध्दीचा माझा हेतू नसतो. अनेकदा मी पंढरपुरला भल्या पहाटे विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो आहे. त्यामुळे राजकारणात आहोत म्हणजे अखंडपणे आम्हाला प्रसिद्धीतीच राहावं वाटतं असं समजणे हा धादांत मुर्खपणा असल्याचेही पवार म्हणाले. अशा कोणत्याही प्रसिध्दीकडे जाण्याची मला गरज नाही असेही ते म्हणाले. हा गैरसमज यापुढे दूर करावा असा सल्लाही त्यांनी टीकाकारांनी दिला. तसेच, त्या गैरसमजाकडे मी जात नाही आणि जाऊ इच्छित नाही’ अशा शब्दात शरद पवारांनी वारकरी परिषदेला सुनावलं आहे.

तसेच, वारकरी संप्रदायांच्या मागण्याकडेही त्यांनी लक्ष घातले आणि ‘इंद्रायणी शुद्ध करण्याच्या वारकरी संप्रदायाच्या मागणीची दखल घेत नेहमीप्रमाणे त्यांच्या शैलित उपस्थितांची मजा घेतली. मी मंत्री तर नाही, मग माझ्या हातात काय आहे?’ पण तरीही ही जबाबदारी पुण्याच्या पालकमंत्र्यांची अधिक आहे त्यामुळे तुम्ही म्हणताय तर सांगतो त्यांना असं म्हणून पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना निरोप कळवणार असल्याचे मिष्किलपणे म्हणाले. तसेच, वारकरी स्वतःसाठी काही मागत नाही, नदी स्वच्छ झाली तर समाजाचा फायदा आहे. मग ही मागणी पूर्ण झाली नाही तर हे सरकार काय कामाचं असेही शरद पवार म्हणाले. एवढेच नाही तर अखंड वारकरी संप्रदायाची ही मागणी पूर्ण करणे ही पवार कुटुंबियांची जबाबदारी आहे असेही पवार म्हणाले.

काय म्हणाले होते राष्ट्रीय वारकरी परिषद –

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देवाला मानत नाही. त्यांनी समर्थ रामदास यांचा एकेरी उल्लेख केला होता. त्यामुळे त्यांना धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका. पूर्वीचे राज्यकर्ते साधना करणारे देवनिष्ठ, धर्मनिष्ठ होते. विनम्र होते. आताच्या नास्तिक राज्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करणे किंवा त्यांचे व्याख्यान ठेवून पांडुरंगाची अवकृपा करुन घेऊ नका, असं पत्रक राष्ट्रीय वारकरी परिषदेने काढलं.

यावर आज शरद पवारांनी असं पत्रक काढणा-या वारकरी संप्रदायाला प्रत्युत्तर दिले आहे.

शरद पवारांना यापुढे धार्मिक कार्यक्रमांना बोलावू नका – राष्ट्रीय वारकरी परिषद