शरद पवार उद्धव ठाकरेंवर नाराज !

Uddhav Thackeray-Sanjay Rathore-Sharad Pawar

मुंबई :  पुजा चव्हाण ( Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्र्यांकडून कारवाई होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी या प्रकरणावरून पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर नाराजी दर्शवली आहे.

संजय राठोड (Sanjay Rathore) यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव टाकरे संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार अशीही माहिती मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER