शरद पवार, उद्धव ठाकरेही भाग घेणार शेतकरी मोर्चात

Sharad Pawar & Uddhav Thackeray & Morcha

मुंबई : कृषी कायद्याच्या विरोधात नाशिकहुन निघालेला किसान मोर्चा भिवंडीत दाखल झाला आहे. हा मोर्चा २६ जानेवारीला राजभवनावर जाणार असून मोर्चात मुख्यमंत्री उद्धव ठकरे (Uddhav Thackeray) व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि इतर नेते भाग घेणार आहेत.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने हा नाशिक ते मुंबई वाहन मार्च काढला आहे. हा मोर्चा आता भिवंडीत दाखल झाला आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे आता सर्वत्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढील आंदोलन यापेक्षाही चारपट मोथे असेल असा इशारा मोर्चाच्या संघटकांनी दिला आहे. २६ तारखेला जवळपास दहा लाख शेतकरी आंदोलन करणार असल्याचे देखील संघटनेने म्हटले आहे.

या मोर्चामध्ये ट्रॅक्टर, जीप इत्यादी वाहनांसह हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER