शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे वसुली चालू होती हे स्पष्ट सांगावे : भाजप नेत्याची टीका

Maharashtra Today

मुंबई :माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) आरोप करत १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचं म्हटलं होतं. या आरोपानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली. हे प्रकरण हायकोर्टापर्यंत पोहचलं आणि हायकोर्टानं  आता या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, असे आदेश दिले आहेत. दरम्यान या सर्व घडामोडींवरून भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टीका केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. “जे सचिन वाझेनी केलं तेच परमबीर सिंह यांनी केलं.

अनिल देशमुख यांनीदेखील तेच करावं. सचिन वाझेनी सगळ्यांची नावं दिलेली दिसत आहेत, परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख सांगत होते अशी माहिती दिली असून तसंच अनिल देशमुख यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) आदेशाप्रमाणे माझी वसुली चालू होती असं स्पष्ट सांगावं. म्हणजे विषय तिथेच संपेल.” असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. माझ्याकडे अनेक कागदपत्रं आहेत ज्यामधून हे फंड कलेक्शन वरपर्यंत जात होतं आणि त्याचे अनेक लाभार्थी असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून अनिल परब हे हॅण्डलर होते. शरद पवारांनी अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न का केला? कारण स्पष्ट आहे…की लाभार्थी.

माझ्या माहितीप्रमाणे आणखी चार लाभार्थी आहेत. संजय राठोड गेले, अनिल देशमुख गेले…याशिवाय आणखी चार लाभार्थ्यांची  नावं बाहेर येणार, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. अजून तर सीबीआयने तपास सुरू  केलेला नाही. एनआयए, सीबीआय आणि यानंतर ईडीपासून इतर सगळ्या यंत्रणा जेव्हा कामाला लागणार तेव्हा ठाकरे सरकारचे अर्धे डझन आऊट होतील, असे सोमय्या म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button