शरद पवारांची सोनिया गांधी यांच्या 45 मिनिटे चर्चा

Sonia Gandhi Sharad Pawar

नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीतील 10 जनपथ या निवासस्थानी भेट घेतली.

भेटीदरम्यान उभयत्यात सुमारे 45 मिनिटे चर्चा झाली.

महाशिव आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत आघाडीचा निर्णय : प्रणिती शिंदे

शरद पवार हे सोनिया गांधी यांच्या भेटील 10 जनपथ येथे जात असताना मुख्य प्र‍वेशद्वारातून गेले. मात्र मीडियाला चुकविण्यासाठी ते अन्य दाराने निघाले. भेटीला जाण्यापूर्वी शरद पवारांना युती संदर्भात विचारले असता ते वैतागाने म्हणाले होते की, याबाबत तुम्हा भाजपला किंवा शिवसेनेला विचारा.