अखेर प्रवीण दरेकर आणि शरद पवारांची झाली भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्यावर निशाणा साधला होता . दरेकरांवर केलेली टीका त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आणि त्यांनी पवार यांना भावुक पत्र लिहिलं. या सगळ्या घटनाक्रमानंतर आता या दोन नेत्यांमध्ये भेट झाली आहे.

एका कार्यक्रमात आज शरद पवार आणि प्रवीण दरेकर यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगल्याच गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं. दरेकर यांचं पुस्तक मिळालं नसल्याचं पवारांनी सांगताच दरेकरांनी तात्काळ पुस्तक सिल्व्हर ओकला पाठवले असल्याची माहिती आहे.

शेतकरी आंदोलनावरून टीका करणाऱ्या प्रवीण दरेकर यांचा शरद पवार यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला होता. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी थेट शरद पवार यांनाच सविस्तर पत्र लिहित या टीकेला उत्तर दिलं होतं. तसंच विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या एक वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा घेणारं पुस्तकही त्यांनी शरद पवार यांना पाठवले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER