तेव्हा पवारसाहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली : आमदार लंकेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Sharad Pawar-Nilesh Lanke

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजच्या प्रश्नांवर तोडगा काढून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यासोबत दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवास करण्याचा योग पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके (Nilesh lanke) यांना आला . यासंदर्भात त्यांनी आपला अनुभव फेसबुक पोस्टद्वारे (Facebook Post) मांडला. तू माझ्यासोबत मुंबईला चल, असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने मला घेऊन आले, असे लंके यांनी म्हटले आहे.

आमदार लंके यांची फेसबुक पोस्ट :

गेल्या दीड वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहे. साहेबांना या अगोदर मी अनेकदा भेटलो; मात्र त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र हा योग जुळून आला तो शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांमध्ये के. के. रेंज विस्तारीकरणाकरिता जमीन संपादित करण्यात येऊ नये याकरिता आमचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यासंदर्भात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात साहेबांनी फोन केला.

nilesh lanke with shard pawarमात्र संरक्षणमंत्री हे कार्यालयात नसल्याने बोलणे झाले नाही. परंतु काही वेळातच साहेबांना राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि भेटीची वेळ ठरली. हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला मांडण्याची संधी साहेबांनी दिली. माझे सर्व मुद्दे कसे योग्य आहेत, हे पवार साहेबांनी संरक्षणमंत्री तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांना पटवून दिले.

याबाबत संरक्षण विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला, असे लंके म्हणाले. त्यानंतर या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर तुम्ही कधी जाणार आहात, असा प्रश्न पवार साहेबांनी मला विचारला. संध्याकाळी निघणार असल्याचे मी सांगितले. तू माझ्यासोबत मुंबईला चल, असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने मला घेऊन आले. दीड तासाच्या प्रवासामध्ये साहेबांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. याशिवाय मराठा आरक्षणाबाबतसुद्धा पवारसाहेबांनी एक आमदार म्हणून माझं मत विचारलं. इतक्या मोठ्या उंचीच्या नेतृत्वाकडूनही माझ्यासारख्या नवीन आमदाराचे मत विचारात घेतले जाते. यावरून साहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली.

काही दिवसांपूर्वी शरच्चंद्रजी पवार साहेब यांचा लहानपणाचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्याबाबतही साहेब भरभरून बोलले. हास्यविनोद करून विमानातील वातावरण अल्हाददायक केले. मध्येच आपले प्लेन कुठे आले आहे, आपण किती उंचावर आहे, त्याचबरोबर तापमान किती आहे, याबाबत पवारसाहेब मला माहिती देत होते. पवारसाहेबांसोबत मला अशा प्रकारे विमानप्रवास करता येईल हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते; मात्र नियतीने आणि माझ्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेमुळे हा योग आला असल्याचे लंके यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवार वडिलांसारखे, त्यांच्या भूमिकेविषयी बोलू शकत नाही – उदयनराजे भोसले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER