
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात नाव आल्यानंतर आता वनमंत्री संजय राठोड यांचे पाय अधिकच खोलात चालले आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत संजय राठोडांच्या राजीनाम्यासाठी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राठोडांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्याचा इशारावजा सल्ला दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा सल्ला आणि विरोधकांना शांत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे.
आता थेट मुख्यमंत्र्यांनी संजय राठोडांना बजावलं आहे. ‘मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे’अश्या कडक शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राठोड यांना बजावलं आहे. त्यामुळे संजय राठोड यांची अधिवेशनापूर्वी गच्छंती होणार असं दिसू लागलं आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत चालला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांचं नाव समोर आलं आणि एकच गदारोळ झाला. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामाच्या मागणी विरोधकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या सल्ल्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आता थेट टोकाची भूमिका घेतली असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पोहरादेवी इथे झालेल्या गर्दीची गंभीर दखल घेत कारवाईचे सक्त आदेश दिलेत. आपल्या माणसाने नियम, कायदे मोडले तरी मुख्यमंत्री सोडणार नाहीत. कारवाई होईलअसे संकेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बुधवारीच दिले होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला