महाविकास आघाडीत आलबेल नाही! शरद पवार – उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तासभर चर्चा

Sharad Pawar and Uddhav Thackeray.jpg

मुंबई :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भेटीगाठी सुरू केल्या की थेट सरकार अस्थिरतेच्या चर्चा सुरू होतात. त्याला कारणही तसेच आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापनेमध्ये पवार इतकीच संजय राऊत यांचीही भूमिका महत्त्वाची होती. आताही जेव्हा जेव्हा राऊत हे शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीसाठी जातात तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो.

विधानसभेनंतर युती तुटल्यानंतर काल पहिल्यांदा संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या एका भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यानंतर या चर्चेवर पडदा पडला होता; मात्र आज राष्ट्रवादीचे प्रमुख महाविकास आघाडीचे समन्वयक शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत बैठक घेतली.

त्यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल एक तास चर्चा झाली. राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर ही बैठक झाल्यानं वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER