मुख्यमंत्र्यांप्रमाणे शरद पवारांनाही धमकीचा फोन, संजय राऊतांनी घेतली भेट

Sharad Pawar-Sanjay raut

मुंबई : सध्या कंगना रानौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) रणकंदन माजले आहे. त्यातच आजपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला (monsoon session) सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे कंगना येत्या ९ तारखेला मुंबईत येणार असल्याने ड्रग प्रकरणात एनसीबीकडून तिचा बयान नोंदवू शकते. यासर्व पार्श्वभूमीवर आज दुपारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. वाय. बी. चव्हाण सेंटर येथे या दोघांमध्ये महत्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल मुखयमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री येथे दाऊदच्या हस्तकाने धमकीचा फोन केल्याचे उघड झाले होते. मुख्यमंत्र्यांचे वांद्र्यातील खासगी निवासस्थान असलेलं मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी काल देण्यात आली आहे. दुबईवरुन मातोश्रीवर धमकीचे तीन ते चार फोन आले. त्या फोनवरुन मातोश्री उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने हे फोन केल्याचे समोर येतं आहे. हे धमकीचे फोन आल्यानंतर मातोश्री निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांना धमकीचे फोन आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’वर सुद्धा धमकीचा फोन आल्याची माहिती पुढे येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांना धमकीचा फोन काल आला होता. भारताबाहेरून हा फोन आल्याची माहिती आहे. तसेच कंगना रनौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आला. कंगनावर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यावर हा फोन आला. याबाबत मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पवारांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER