शरद पवार, अजित पवारांनी मानले कोरोना योद्धे डॉक्टरांचे आभार !

Ajit Pawar - Sharad Pawar - Covid Warriors

मुंबई : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यात रुग्णांची संख्या दिवसागणित वाढतच चालली आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याचा सर्वांत जास्त ताण हा डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांवर पडला आहे. त्यातच आज राष्ट्रीय डॉक्टर्स डे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांप्रती आभार व्यक्त केले आहे.

आज राष्ट्रीय डॉक्टर्स डेनिमित्त कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या,आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणाऱ्या, दिवसरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणाऱ्या सर्व डॉक्टर्सचे मनःपूर्वक आभार. या कठीण काळात कृपया आपलेही नागरिक म्हणून कर्तव्य ओळखू या व वैद्यकीय सेवांवरील ताण कमी करण्यास सहकार्य करू या, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आभार मानले आहेत.

कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई, आशाताई, पोलीस या सर्व कोरोना योद्ध्यांचं संरक्षण कर आणि लढायला बळ दे, अशी प्रार्थना आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठला चरणी करतो. ‘राष्ट्रीय डॉक्टर दिना’च्या शुभेच्छा! ‘रुग्णसेवे’मार्फत मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्ध लढाईत पहिल्या फळीतले योद्धे म्हणून ते लढत असताना त्यांच्याबद्दल आदर आणखी वाढलाय. ही मानवसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल! आपण सदैव त्यांचे ऋणी राहू! असे म्हणत अजित पवार यांनीही आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER