शरद पवार पुन्हा रूग्णालयात, तोंडातील अल्सर काढला

Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केल्यानंतर आज त्यांच्या तोंडातील अल्सरही काढण्यात आला आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम आणि ठणठणीत आहे. ते सध्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे रुटीन चेकअप आणि फॉलोअपसाठी पवार ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना तोंडाचा अल्सर असल्याचं आढळून आल्याने हा अल्सर काढून टाकण्यात आला आहे. सध्या शरद पवार हे रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. तसेच पवार साहेब रोज कोरोना संसर्गाचा आढावा घेत आहेत. ते लवकरच बरे होऊन आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतील, अशी माहितीही मलिक यांनी ट्विट करत दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button