‘आस्ते घ्या, भावनिक होऊ नका !’ पवारांचा पोलीस आयुक्तांना सल्ला

Parambir Singh-Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना तातडीने बैठकीसाठी बोलावले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सुशांतसिंह प्रकरणासंदर्भात जवळपास २० मिनिटे चर्चा झाली. या सर्व प्रकरणावर मुंबई पोलिसांवर (Mumbai police) बरीच टीका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी वेळीच एफआयआर दाखल केला नाही, असा आरोप मुंबई पोलिसांवर वारंवार केला जात आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि शरद पवार यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली आहे. या बैठकीत शरद पवार यांनी परमबीर सिंह यांना ‘आस्ते घ्या. भावनिक होऊ नका. तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याला बळी पडू नका.’ अशा सूचना दिल्या असल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, हे प्रकरण सीबीआयकडे गेलं. यानंतर ईडी आणि एनसीबीदेखील या प्रकरणाच्या चौकशीत दाखल झाली. याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकारमधील घटक पक्ष शिवसेना यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. यामध्ये कुठे तरी सरकारची बदनामी होत असल्याचं सध्या दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER