कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शरद पवार सक्रिय, केंद्राला दिला ‘हा’ सल्ला

Sharad Pawar.jpg

नवी दिल्ली: केंद्र सरकारने (Central Govt) काल अचानक कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पासरली आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाले आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) आता सक्रिय झाले आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी आज केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकार कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी काही उपाययोजना करणार का/ याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

लासलगावात कांद्याचे दर 3 हजार रुपयांवर जाताच अचानक केंद्र सरकारच्या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. नऊ वाजता कांद्याचा लिलाव सुरु होणार असल्याने बाजार भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबई,चेन्नई पोर्टवर तसेच बांग्लादेश बॉर्डरवर व्यापाऱ्यांचा वीस हजार मेट्रिक टन कांदा कंटेनर आणि रेल्वे मालगाडीत पडून आहे. तर दुसरीकडे कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळले आहे. नाशिक येथे कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आता शरद पवार यावर काही तोडगा काढण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER