शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) आज दाखल करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

शरद पवार यांना सात  दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार आज त्यांना  ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उद्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button