शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत

Sharad Pawar-Mama Banerjee

मुंबई :- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ३१ मार्चला पोटाची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे पवार यांचे आगामी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार (Sharad Pawar) सुरू असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र, रुग्णालयात दाखल केल्याने पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसाठी (Mamata Banerjee) निराशादायक गोष्ट मानली जात आहे. शरद पवार १ एप्रिलपासून तीन दिवस पश्चिम बंगालमध्ये प्रचार करणार होते. पवार यांनी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसाठी प्रचार करू नये, अशी विनंती काँग्रेसने केली होती. मात्र, ही विनंती फेटाळत शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीसाठी जायचे ठरवले होते. मात्र, त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने जाता येणार नाही.

ममता बॅनर्जींसाठी पश्चिम बंगालची लढाई पूर्वीपेक्षा अधिक कठीण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसारख्या कट्टर नेत्याच्या प्रचंड मोहिमेचा सामना करण्यासाठी बॅनर्जींना राष्ट्रीय पातळीवर मोदीविरोधी नेत्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. भाजपला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या शरद पवारांसारख्या नेत्याचा ममता बॅनर्जींना प्रचारात फायदा होण्याची शक्यता होती. मात्र, ऐन लढाईच्या वेळी तृणमूल काँग्रेसला शरद पवारांची रसद मिळणार नसल्याने ममता बॅनर्जी अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button