पवारसाहेबांच्या पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल – नवाब मलिक

Sharad Pawar admitted to Breach Candy Hospital - Nawab Malik
  • ३१ मार्च रोजी शस्त्रक्रिया केली जाणार…
  • आजपासून पवारसाहेबांचे सर्व कार्यक्रम रद्द…

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली.

दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहेत; शिवाय ३१ मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया केली जाईल. त्यामुळे शरद पवारसाहेबांचे आजपासूनचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : तब्येत पवारांची बिघडली, सरकारचे माहीत नाही; चंद्रकांतदादांचे सूचक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button