पोटदुखीचा त्रास वाढल्याने शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar - breach candy hospital - Maharastra Today

मुंबई :- आज दुपारी पोटदुखीचा त्रास वाढल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उद्या बुधवारी त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आज संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी आज दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली. त्यानंतर पवार रुग्णालयात दाखल झाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनीही दुपारी पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. काल पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. शरद पवारांवर उद्या बुधवारी एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button