शरद पवार पुन्हा सक्रिय, आज राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत चर्चा

Sharad Pawar Maharastra Today

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar ) हे पुन्हा सक्रिय झाले आहे . शरद पवार आज पक्षाच्या मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. मुंबईत संध्याकाळी पाच वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. मराठा आरक्षण(Maratha Resrvation), पदोन्नतीमधील आरक्षणाचा मुद्दा अशा विविध मुद्द्यांवर काय भूमिका घ्यायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

दरम्यान तत्पूर्वी पवार यांनी पित्ताशयाचं ऑपरेशन झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास पवारांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तब्बल अर्धा तास ही बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे समजू शकले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button