…आणि उदयनराजे भोसलेंनी शरद पवारांसोबतचा फोटो केला शेअर

Sharad Pawar-Udyanraje Bhosale

मुंबई : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८० वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते दिग्गज नेते मंडळींनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आदरणीय शरद पवार यांना ८० व्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा, आपणास दीर्घायुष्य लाभो.’ अशा शब्दांत उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER