राठोडांविरोधात फिर्याद दाखल करणा-या शांताबाई पुजाच्या आजी नाही ; वडीलांनी केला खुलासा

Pooja Chavan

मुंबई : बीडची (Beed) राहणारी पुजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्याचे प्रकरण घडले आणि चार दिवसानंतर या प्रकरणात शिवसेनेचे (Shiv Sena) मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) असल्याचा दावा विरोधकांनी केला. त्या दिवसापासून या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

अनेक कॉल रेकॉरेडिंग, पुजा चव्हाणच्या फेसबूकवरील फोटो या सगळ्यामध्ये या प्रकरणात शिवसेनेचे नेते राज्याचे वनमं६ी संजय राठोडच असल्याचा दावा विरोधकांनी केला व त्यानंतर शाताबाई चव्हाण नावाच्या महिलेनेही पुढे येऊन आपण पुजाची आजी असून पुजाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर शांताबाई चव्हाण यांनी संजय राठोड यांच्याविरोधात फिर्याददेखील दाखल केली आहे.

या प्रकरमात आतापर्यंत पुजाच्या आईवडीलांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही उलट या प्रकरणात संजय राठोड निर्देोष असल्याचेच पुजाचे पालक सांगत आहेत. आता तर पुजाच्या वडीलांनी हेदेखील खुलासा केला आहे की, शांताबाी पुजाच्या आजी नाही.

पुजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी आधीच आपली कोेणीविरूद्ध तक्रार नसल्याचं स्पष्ट केलं होतं तसेच नुकतेच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कुटूंबाची आणि बंजारा समाजाची होत असलेली बदनामी थांबवण्यासाठी प्रयत्न करावे अशीही विनंतीसुद्धा केली आहे.

एवढेच नाही तर, आता पजाचे वडील सांगत आहेत की, शांताबाई या पूजाची आजी नाही. आमच्या भावकीत कदाचित त्या असतील पण गेल्या 25 वर्षांपासुुन आमची आणि शांताबाईंची भेट नाही त्यामुळे असं कोणीही येऊन फिर्याद दाखल करेल, पोलिसांनी त्याची चौकशी करून मग पुढील कारवाई करायला पाहीजे असंही ते म्हणाले.

पुजाच्या मृत्युनंतर विरोधकांनी सत्ताधारी ठाकरे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. आता पूजा चव्हाणच्या वडीलांनी केलेला खुलासा नुसार पूजाची तथाकथीत आजी शांताबाई यांनी या प्रकरणात अचानक उडी का घेतली असेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पूजा चव्हाणचा बळी गेला. परंतू, या सर्व प्रकरणात राजकीय पक्ष आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही तिच्या वडीलांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER