शंखपुष्पी – वनस्पती परीचय

शंखपुष्पी

शंखपुष्पी चे नाव तसे सर्वांना परीचित आहेच. परीक्षेचा काळ आला की शंखपुष्पी सिरपचा खप वाढलेला असतो. विद्यार्थी दशेत अनेकांना आईने किंवा कुणीतरी शंखपुष्पी सिरप किंवा टॅबलेट घ्यायला सांगितली असेल. बुद्धी वाढविणारे औषध म्हणून शंखपुष्पी प्रसिद्ध आहेच. शंखाप्रमाणे पांढऱ्या गुलाबी रंगाची फुलं या वनस्पतीला येतात म्हणून शंखपुष्पी हे नाव या वनस्पतीचे आहे. यास क्षीरपुष्पी ( दूधाप्रमाणे फुलं) शंखाह्वा, मेधा( मेधा वाढविणारी) मांगल्य कुसुमा, स्मृतिहिता ( स्मृतीकरीता उत्तम) अशी पर्यायी नावे आली आहेत. शंखपुष्पीचे पंचाग उपयुक्त आहे.

मस्तिष्कावर मज्जावह संस्थानवर याचा विशेष प्रभाव दिसून येतो. म्हणूनच मानस रोग, अनिद्रा, मस्तिष्क दौर्बल्य, स्मृतिनाश, ग्रहण शक्ती चांगली नसणे इ. सर्व तक्रारींवर शंखपुष्पी उत्तम कार्य करते. मस्तिष्क आणि वातवाहिन्याना ताकद देण्याचे काम शंखपुष्पी करते.

  • आचके येणे, भ्रमिष्टपणा, उन्माद सारख्या मानस रोगांवर शंखपुष्पी खूप उपयोगी आहे.
  • शंखपुष्पी केसांच्या आरोग्याकरीता देखील खूप उपयोगी आहे. केस गळणे केस दुभंगणे इ. सर्व केसाच्या तक्रारी दूर करून केस दाट होतात. म्हणून अनेक केश्य तेलांमधे शंखपुष्पीचा वापर केला जातो.
  • रक्तदाब जास्त असणे, चिंता, मानसिक ताण असणे अशा तक्रारींवर शंखपुष्पी खूप उपयोगी आहे.
  • रक्तवमन (Haemetemesis) करीता सुद्धा शंखपुष्पी उपयोगी ठरते.

शंखपुष्पीचे प्रत्येक अंग औषधी गुणाचे असते. त्याचा उपयोग अनेक औषधी कल्प करतांना होतो. मानस रोगांवर वापरण्यात येणारी औषधे केश्य तेलात शंखपुष्पीचा वापर करण्यात येतो. शंखपुष्पी सिरप, बुद्धी स्मृती वाढविणाऱ्या पावडर यात शंखपुष्पी हमखास असतेच.

कोणतेही वनस्पती औषध म्हणून वापरतांना शरीर, त्रिदोष वय असा विचार महत्वाचा ठरतो. हेच शंखपुष्पी वा सर्वच वनस्पतींविषयी आहे. या वनस्पतींचे महत्त्व ओळखणे मात्र गरजेचे आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER