फडणवीसांच्या कामाचे शंकरराव कोल्हेनी केले कौतुक

Maharashtra Today

कोपरगाव :- कोरोनाच्या साथीच्या काळात माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)राज्यभर फिरून जनजागृती करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, या शब्दात संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक शंकरराव कोल्हे (Shankarrao Kolheni) यांनी फडणवीसांची प्रशंसा केली.

देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कोपरगाव परिसराला भेट देऊन संजीवनी केअर सेंटरची (Sanjeevani Care Centre) पाहणी केली. समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यावर आजवर आलेल्या प्रत्येक संकटात कोपरगावकर आपले कुटुंब मानून केलेल्या मदतीची माहिती दिली. संजीवनी फाउंडेशनने केलेल्या मदत कार्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली. जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी करोना व अन्य सामाजिक कामात निर्माण होणाऱ्या अडचणी कशा सोडवायच्या याबाबत चर्चा केली.

शंकरराव कोल्हे म्हणालेत की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संकटकाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सामान्य माणसांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करून काम करत आहेत. आमच्या काळात महापूर, पाणी प्रश्न, दुष्काळ, गारपीट, कुपोषण, आदी प्रश्न मोठे होते, पण सध्या कोरोनाची साथ मोठे संकट आहे. ही वेळ एकमेकावर करण्याची नाही. केंद्र व राज्य सरकारमध्ये अशावेळी समन्वय असणे गरजेचे आहे.

आरोग्याचे रहस्य

आयुर्वेदात कोरफडीचे महत्त्व सांगितले जाते, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पचनासह इतर शारीरिक लाभ कोरफडीने होतात म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून आपण मी कोरफड खातो आहे, असे शंकरराव कोल्हे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button