शिवसेना आणखी मजबूत; गडाखांच्या उपस्थितीत मुस्लिम नेत्यांचा ‘जय महाराष्ट्र !’

Shankarrao Gadakh

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला होता. त्यामुळे काँग्रेसचा (Congress) गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात (Ahemadnagar news) शिवसेनेला नवी उभारी मिळण्याची चर्चा सुरू होती. मात्र आता ही चर्चा प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे.

ही बातमी पण वाचा:- माझे विजेचे बिल ३ लाखांनी कमी केले, सामान्य जनतेचे काय?, भाजप आमदाराचा उद्विग्न सवाल

गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नेवासा येथे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे सत्कार कार्मक्रम मुस्लिम समाजाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

शंकरराव गडाख हेच आमचा पक्ष आणि संघटना आहेत. सर्व मुस्लिम समाज एकजुटीने त्यांच्याच पाठीशी भक्कमपणे उभा आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाचे आम्ही स्वागत करतो. नेवासे तालुक्याच्या विकासासाठी ती गरजच होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाआघाडी सरकारचे काम कौतुकास्पद आहे, असे मुस्लिम युवा नेते असिफ पठाण यांनी सांगून नेवासे तालुक्यातील हा समाज गडाखांसह शिवसेनेच्या पाठीशी एकवटला असल्याचे सूचक संकेत दिले.

निमित्त होते गडाख यांच्या गावभेटीचे. शिवसेना प्रवेशानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेवासे शहरात मुस्लिम समाजाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय संघटनांकडूनही मंत्री गडाखांचा सत्कार करण्यात आला. गडाख यांनी शिवसेनेत प्रवेशानंतर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या; मात्र नेवासे शहरातील त्यांचे स्वागत काही वेगळेच ठरले.

या वेळी मंत्री गडाखांनी उपस्थित प्रत्येक कार्येकर्त्याशी संवाद साधून कोरोना महामारीच्या विरोधीतील लढ्यात सर्वांनी सरकारला सहकार्य करण्यासाठी नियमांचे पालन करून स्वतःबरोबरच परिवार व समाजाची काळजी घेण्याचे आवाहन केले. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय, लहुजी सेना या राजकीयसह विविध सामाजिक संघटनांनी मंत्री शंकरराव गडाख यांचा सत्कार केला.

मंत्री गडाखांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर संपूर्ण नेवासे तालुका जय महाराष्ट्रमय झाला. मुस्लिम ज्येष्ठ नेते गफूर बागवान हे कार्यालयात येताच मंत्री गडाखांसह उपस्थितांना जय महाराष्ट्र म्हणताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. मंत्री शंकरराव गडाख यांचे आगमन होताच त्यांचा शिवसेना प्रवेशबद्दल मुस्लिम समाजाच्यावतीने ज्येष्ठ नेते गफूर बागवान, युवा नेते असिफ पठाण, अब्दुल्ला बागवान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक ऍड. काकासाहेब गायके, बाळासाहेब कोकणे, सुलेमान मणियार, नारायण लोखंडे, पंकज जेधे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER