शेन वॉटसनला भविष्य समजते की काय?

Shane Watson

आयपीएलमध्ये (IPL) रविवारी चेन्नईच्या (CSK) पंजाबवरील(KXIP) विजयात सामनावीर ठरलेला अष्टपैलू शेन वाॕटसन (Shane Watson) याला बहुधा भविष्य समजत असावे कारण चेन्नईचा संघ आयपीएलच्या पुढच्या सामन्यांमध्ये आता चांगली कामगिरी करेल अशी भविष्यवाणी त्याने शनिवारीच केली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी सीएसकेने किंग्ज इलेव्हनवर एकही गडी न गमावता दणदणीत विजय मिळवला. तोवर आधीच्या चार पैकी तीन सामने गमावलेल्या चेन्नईच्या संघाला बहुतेकांनी बाद ठरवले होते.

चेन्नईच्या दणदणीत विजयात स्वतः वाॕटसनने नाबाद 83 धावांची खेळी करताना फाफ डू प्लेसीससोबत नाबाद 181 धावांची सलामी दिली.

शेन वाॕटसनने शनिवारच्या आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, द परफेक्ट गेम फाॕर @चेन्नईआयपीएल इज कमींग म्हणजे चेन्नईसाठी एक परफेक्ट सामना येतोय. आणि खरोखरच चेन्नईसाठी रविवारचा सामना परफेक्ट ठरला. त्यांनी चांगली सुरुवात मिळालेल्या पंजाबच्या संघाला 4 बाद 178 धावांवर मर्यादीत ठेवले आणि नंतर एकही गडी न गमावता 14 चेंडू शिल्लक राखून सामना जिंकला.

ही बातमी पण वाचा : आयपीएलमध्ये विकेट न गमावता जिंकलेले सामने

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER