IPL मध्ये खेळताना दिसणार नाही शेन वॉटसन, फ्रँचायझी क्रिकेटला दिला निरोप

Shane Watson

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) धाकड़ खेळाडू शेन वॉटसनने (Shane Watson) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू यापुढे IPL मध्ये खेळणार नाही. वॉटसनने फ्रँचायझी क्रिकेटला निरोप दिला आहे.

शेन वॉटसन IPL मध्ये राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. शेन वॉटसनने २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सला IPL चे जेतेपद मिळवण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. शेन वॉटसनने IPL २०१८ च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतक झळकावून चेन्नईला तिसरे IPL विजेतेपद मिळवून दिले होते.

यावेळी शेन वॉटसनची बॅट IPL २०२० मध्ये काम करू शकली नाही. वॉटसनने या मोसमात चेन्नईतर्फे ११ सामन्यांत २९९ धावा केल्यात ज्यात २ अर्धशतकांचा समावेश होता. IPL मध्ये शेन वॉटसनने १४५ सामन्यात ३८७४ धावा केल्या आणि त्याच्या नावावर ९२ विकेट्सही आहेत. IPL मध्ये वॉटसनने ४ शतके ठोकली आहे.

या हंगामात वॉटसनने ११ सामन्यांत २९.९० च्या सरासरीने धावा केल्या. ११ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने त्याच्या खात्यात ८३ धावांची नाबाद खेळी करत २९९ धावा केल्या. शेन वॉटसन आपल्या सेवानिवृत्तीबद्दल चेन्नईच्या ड्रेसिंग रूममध्ये सांगितले असता तो भावनिक झाला. तो म्हणाला की या फ्रँचायझीसाठी खेळणे त्याच्यासाठी हा एक विशेषाधिकार होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER