शेन वॉर्न म्हणतो, टी-20मध्ये गोलंदाजांना पाच षटके द्या!

Shane Warne

टी-20 (T-20) क्रिकेटमध्ये फलंदाजी व गोलंदाजीत संतुलन आणण्यासाठी गोलंदाजांना चार ऐवजी प्रत्येकी पाच षटके देण्याची मूभा द्यावी असा प्रस्ताव यशस्वी ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने (Shane Warne) दिला आहे. सध्या टी-20 सामन्यांमध्ये एक गोलंदाज अधिकाधिक चारच षटके गोलंदाजी करु शकतो.

ही बातमी पण वाचा:- मेस्सीची कोणती गोष्ट रोनाल्डोला हवीहवीशी वाटते?

इंग्लंडविरुध्दच्या टी-20 मालिकेत समालोचन करताना त्याने हे मत मांडले. तो म्हणतो की, सध्या टी-20 सामने मोठ्या प्रमाणात फलंदाजीधर्जिणे आहेत. त्यापेक्षा संतुलन आणण्यासाठी डावात चार गोलंदाजांना प्रत्येकी पाच षटके टाकू द्यायला हवीत. तसे केल्याने तुमच्या सर्वोत्तम गोलंदाजांना आधिक संधी मिळेल. इंग्लंडच्या सलामी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी उडवल्याचे पाहून त्याला हा उपाय सुचला आहे. जर तुमचे गोलंदाज यशस्वी ठरत असतील तर कोणताही कर्णधार त्यांना अधिक उपयोगात आणायचा विचार करेल पण सध्या चारच षटके टाकता येणार असतात त्यामुळे दोन किंवा तीन षटके टाकल्यावर हुकूमी गोलंदाज काढून घ्यावा लागतो. पण पाच षटके मिळाली तर आणखी एखादे षटक जादा देता येईल.

इंग्लंडचा माजी कर्णधार माईक आथरटनला मात्र असे वाटते की, पाच षटकांची मूभा मिळाली तर अष्टपैलू खेळाडूंना गोलंदाजीच्या संधी कमी मिळतील पण हा प्रस्ताव चांगला आहे. क्रिकेटबाबत शेन वॉर्नच्या सूचना नेहमीच चांगल्या असतात असे त्याने म्हटले आहे.

शेन वॉर्नने हीच सूचना व्टिटद्वारेही मांडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) चे अध्यक्ष सौरव गांगूली व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)लासुध्दा टॕग केले आहे. त्यात त्याने आयपीएल 2020 मध्ये हा प्रयोग करुन पहावा असे सुचवले आहे.

छोट्या सीमारेषा, पॉवर प्ले, क्षेत्ररक्षणाची बंधने आणि दोन नवे चेंडू यामुळे मर्यादीत षटकांचे क्रिकेट फलंदाजांच्या बाजूने झुकलेला असल्याने वॉर्नच्या या प्रस्तावाला समर्थन मिळण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्ससोबत शेन वॉर्नला आयपीएलचा अतिशय जवळून अनुभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER