शम्मी कपूरने म्हटले होते सनी देओल खूप पुढे जाईल

Sunny Deol - Shammi Kapoor

हीरे की परख जौहरी को ही होती है असे म्हटले जाते. याची अनेक उदाहरणे आपल्या समोर असतातही. बॉलीवूडमध्येही असे अनेक जौहरी आहेत ज्यांनी हिऱ्यांचा तपास करून बॉलिवूडला दिले आहेत. अनेकदा अनेक कलाकार आपल्या मुलाला लाँच करतात परंतु ते नेहमीच यशस्वी होतात असे नाही. याचे कारण तो यशस्वी होईल की नाही याची कोणतीही खातरजमा न करता त्यांना लाँच केले जाते. आणि कालांतराने के नायक कुठे फेकले जातात तेच कळत नाही. जौहरी आणि हिऱ्याची परख याची कथा सांगण्याचे कारण आहे शम्मी कपूर (Shammi Kapoor).

बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रचंड यशस्वी झालेल्या आणि आजही स्वतःची वेगळी इमेज राखून असलेल्या धर्मेंद्रने (Dharmendra) सनीला (Sunny Deol) लाँच करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने ‘बेताब’ चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली. सनी सोबत नायिका म्हणून अमृता सिंहला साईन करण्यात आले आणि शूटिंग सुरु करण्यात आले. या चित्रपटात एका छोट्या भूमिकेसाठी धर्मेंद्रने शम्मी कप्पूर यांना गळ घातली. शम्मी कपूर आणि धर्मेंद्रचे अत्यंत चांगले संबंध असल्याने शम्मी कपूर यांनी लगेचच होकार दिला आणि ते सेटवर पोहोचले. सेटवर त्यांनी सनी देओलला काम करताना पाहिले आणि पुढे जाऊन हा मुलगा प्रचंड यशस्वी होईल असे म्हटले.

सेटवर सनी देओल प्रत्येक गोष्ट अत्यंत बारकाईने पाहात होता आणि त्याची माहिती करुन घेत होता. तसेच प्रत्येक गोष्ट चांगलीच कशी होईल याची पूर्ण काळजी घेत होता. अभिनय करतानाही तो वास्तव वाटेल असा त्याचा प्रयत्न असे. सेटवर असलेल्या पत्रकाराशी बोलताना शम्मी कपूर यांनी त्याला म्हटले, माझे शब्द लिहून ठेव. हा मुलगा ज्या पद्धतीने काम करतोय त्यावरून त्याच्यात स्टार बनण्याची पूर्ण क्षमता आहे. भविष्यात हा मुलगा मोठा स्टार होईल आणि तो खूप पुढे जाईल असे म्हटले. सनीची काम करण्याची पद्धत पाहून त्यांनी ही भविष्यवाणी केली होती. आणि पुढे ती खरी ठरली. ‘बेताब’ पूर्ण होऊन प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. त्यानंतर सनीने मागे वळून पाहिले नाही. एकाहून एक सरस चित्रपट दिले. एवढेच नव्हे तर तो दिग्दर्शकही झाला आणि आता त्याचा मुलगाही नायक म्हणून समोर आला आहे. मात्र त्याच्याबाबत कोणी भविष्यवाणी केली आहे की नाही ते मात्र माहित नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER