आमिर खानचा लगान नाकारला होता शमिता शेट्टीने

Lagaan - Shamita Shetty

कलाकारांना जेव्हा एखादा चित्रपट ऑफर होतो तेव्हा कलाकार आणि कथानक बघून तो चित्रपट करायचा की नाही याचा निर्णय कलाकार घेतात. तर कधी कधी चांगली कथा असली तरी त्याचे महत्व न ओळखता मनोरंजनात्मक चित्रपटाच्या मागे लागल्याने हातातून चांगली संधी एखाद्या कलाकाराच्या हातातून गेल्याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये (Bollywood) आहेत.

आशुतोष गोवारीकर द्वारा दिग्दर्शित आणि आमिर खान (Aamir Khan) द्वारा निर्मित आणि अभिनीत लगान (Lagaan) चित्रपट बॉलिवूडच्या इतिहासातील एक महत्वाचा चित्रपट मानला जातो. या चित्रपटात आमिरची नायिका म्हणून ग्रेसी सिंहची निवड करण्यात आली होती. या चित्रपटानंतर ग्रेसी सिंह (Gracy Singh) स्टार झाली होती परंतु तिला चित्रपटसृष्टीत करिअर करायचे नसल्याने ती लवकर बॉलिवूडमधून बाहेर गेली. परंतु कमी जणांना ठाऊक आहे की, हा चित्रपट ग्रेसीच्या अगोदर शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला (Shamita Shetty) ऑफर करण्यात आला होता. परंतु हा चित्रपट शमिताने यशराजच्या चित्रपटासाठी नाकारला आणि तिथेच तिचे नशीब फिरले. जर शमिताने लगान केला असता तर तिच्या करिअरला चांगला आकार मिळाला असता हे नक्की.

शमिताने 20 वर्षांपूर्वी म्हणजे 2000 मध्ये यशराज बॅनरच्या ‘मोहब्बतें’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. शमिताला जेव्हा लगानची ऑफर दिली होती तेव्हाच मोहब्बतेंचीही ऑफर आली होती. या बिग बजेट चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख ख़ान, ऐश्वर्या राय असल्याने शमिताने या चित्रपटात उदय चोप्राची नायिका बनण्याचे मान्य केले आणि लगान सोडला. ही माहिती शमिताची बहिण अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेच (Shilpa Shetty) एका मुलाखतीत दिली होती.

बॉलिवूडमध्ये (Bollywood) अयशस्वी झालेली शमिता सध्या वेबसीरीजमध्ये काम करताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER